
वसई(प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील कामण येथील अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्याकरिता नायब तहसीलदार प्रदीप मुकणे व वसई मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे हे गेले होते. त्यावेळी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी मुलीच्या हाती कार्यालय सोपवून गेले होते.
वसई मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांच्या कार्यालयात एक खाजगी मुलगी काम करीत असून ती मुलगी सर्व शासकीय कागदपत्रे हाताळते. त्या मुलीच्या हाती कार्यालय सोपवून मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांच्या सोबत कामण परिसरात अनधिकृत बांधकामांची पाहणी करीत होते. कार्यालयाची जबाबदारी एका खाजगी कर्मचारी म्हणून त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या मुलीवर सोपवून गेल्यानंतर कार्यालयातून एखादे महत्वाचे कागदपत्र गायब झाले तर त्याला जबाबदार कोण?
तहसीलदार उज्वला भगत यांनी याची दखल घेऊन मंडळअधिकारी शशीकांत पडवळे व त्यांनी कामाला ठेवलेले खाजगी व्यक्तीवर उचित कारवाई करावी.
