

◆ ‘करून दाखवले’ म्हणाऱ्या शिवसेनेने भक्त देवापासून वंचीत करून दाखवले: उत्तम कुमार
राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर वसई (प) शास्त्रीनगर येथील गणपती मंदिराबाहेर भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी हनुमान लक्ष्मीधाम गोशाळेचे महंत सदानंद बन महाराज यांनी विशेष उपस्थित लावली.
उत्तम कुमार यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केरळ राज्यात असलेले कम्युनिस्ट सारखा पक्ष मंदिरे उघडतो आहे आणि आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना भक्त देवा पासून वंचित राहतो आहे हे पाहवत नाही. ‘करून दाखवले’ म्हणाऱ्या शिवसेनेने भक्त देवापासून वंचीत करून दाखवले. असा टोला त्यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला लगावला.
यावेळी वसई रोड मंडळाचे अध्यक्ष रामनुजम, रमेश पांडे, सुरेश देशमुख, ऍड.राजेश दोषी, ऋषी परानी, दिनेश मकवाना, गोपी मेनोन, केतन गांधी, श्रीकुमारी मोहन, हर्षा फनविया आदी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात संत व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.