
………….. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते यांच्यात अस्वस्थता आहे.त्यातच त्यांची लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून काही दिवस त्याच्यावर रुग्णालयातच उपचार होणार आहेत. त्यांच्या प्रकृतीत उत्तरोत्तर सुधारणा व्हावी तसेच त्यांचा आयोद्धा दौरा लवकरच पार पडावा या करिता मनसैनिक देवाकडे जागोजागी साकडे घालत आहेत. याच अनुषंगाने नालासोपारा शहरातील पूर्वकडील मोरेगाव वार्ड क्रमांक ३८ च्या शाखेच्या वतीने शाखाअध्यक्ष शेखर गुंजारी. उपशाखाअध्यक्ष अजय गुप्ता. यांच्या माध्यमातून हनुमान मंदीर नगीनदासपाडा येथे चालीस पठण. महाआरती. होम हवन.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपारा शहरसचिव श्री.राज नागरे.विरार महिला शहरसचिव अर्चना गोळे.सौ. निकिता जोशी. उपविभाग अध्यक्ष संतोष रेवाळे. रोजगार व स्वयंरोजगारचे पालघर जिल्हा संघटक जय जैतापकर. समाजसेवक सत्ययेंद्र पांडये. मनोहर घरटकर. पवन सावंत यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.कायदा आणि सुव्यवस्था आबादीत राहावी या करिता तुळींज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


