
नालासोपारा (प्रतिनिधी) : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय गुनिजन गौरव महासंमेलन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मानकरी निवड म्हणून कोकणचे सुपुत्र समाज सेवक पत्रकार राजेश रमेश चौकेकर यांना यंदाचा मानाचा ” राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार २०२० “जाहीर करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याची दखल घेवून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी चे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी जगदाळे यांनी त्यांच्या नावाची निवड केली.
गवळी सेवा फाऊंडेशन महा. पालघर जिल्हाध्यक्ष आणि कोंकण सफारी सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक म्हणून ते गरजू व्यक्ती, विद्यार्थी, ज्येष्ठांना मदत तसेच महिला सक्षमीकरण कार्य, युवा तरुणांना रोजगार मार्गदर्शन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरात भाग, घेवून सामाजिक बांधिलकी जपत आपले सामाजिक सेवेचे कार्य करत असतात. कोरोना महामारी काळात अन्न धान्य वाटप साठी मदत, निर्जंतुकीकरण करत सहभाग, अहोरात्र सेवा देवून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना पाणी खाद्य वाटप अशे अनेक प्रकारे त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. त्याबद्दल त्यांना कोरोना योध्दा सन्मान अनेक सामाजिक संस्था नी प्रदान केला आहे. राज्य दैनिक बाळकडू पत्रकार म्हणून ही ते चांगले कार्य नेहमीच दाखवून देतात, तसेच सामाजिक प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करतात.
लवकरच पुरस्कार वितरण समितीमार्फत पुरस्कार सोहळा आयोजित करून संस्थेतर्फ आकर्षक मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
