(आकेश मोहिते):- आज कोरोना मुळे आपल्या मराठी वाद्यवृंदातील कलाकारांवर उपासमारी ची वेळ आली आहे. म्हणून अश्या गरजू कलाकारांना एक मदतीचा हात देण्यासाठी स्थानिक पातळीवर मदत घेण्याचा व अन्नधान्याची पाकिटं देऊन सहाय्य करण्याचा विचार आला.
#_जयवंत वाडेकर सर सिने-नाट्य अभिनेता यांच्याकडे शब्द टाकला गेला. त्याला पुढच्या दहा मिनिटातसकारात्मक प्रतीसाद दिला. आपले आभार तुमच्यामुळे हे शक्य झालं. आमचे कलानिधी समिती प्रतिनिधी वर्षा धारपे व संदीप येलवे ताबडतोब विरारचे आमदार_श्री._हितेंद्रजी_ठाकुर यांची तातडीने भेट घेतली. त्यांनी लगेच १०० पाकिटे देण्याची मान्यता दिली.
म्हणून काल गुरुवार दिनांक २३।७।२०२० रोजी पालघर जिल्ह्यात ‘विरार-नालासोपारा व वसई ‘ शहरात राहणाऱ्या आणि वादक, गायक, निवेदक, बतावणी करणारे, नकलाकार, साऊंड लाईट तंत्रज्ञ अश्या पूर्णवेळ मराठी वाद्यवृंद व्यावसायिक रंगभूमीवर कला सादर करणाऱ्या कलाकारांना मदत पोहोचवण्यासाठी आम्ही सकाळीच निघालो.
अडचण अडथळे इथे संपत नाही,
गेले ३ महिने अविश्रांत मेहनत करणारे आमचे सहकारी कार्याध्यक्ष मा. बाळकृष्ण पांचाळ यांना निघतानाच आईची तब्येत बिघडल्याने अचानक कोकणात गावी जावे लागले. त्वरित दुस-या गाडीची जमवाजमव करण्यासाठी सदस्य दत्ता चाळके यांना फोन केला. ते ताबडतोब कार्यालयात अर्धा दिवस टाकून स्वतःचा ५० वा वाढदिवस असताना अख्खा दिवस मोडून विरारला आले. संघेश पवार व सुबोध कदम ही मंडळी तळमळीने दिवसभर राबताना दिसत होती .
या धावपळीत दत्ताचा ५० वा वाढदिवसही केक कापून आम्ही साजरा केला गेला.
मुंबईहून कलाकारांच्या सहाय्यासाठी संस्था विरार पर्यंत आली याचं कौतुक कलाकारांच्या मुखी होतं. मनात आनंद व समाधान…….. काही गरजुंच्या डोळ्यात पाणी

असंच इतर विभागातही ( पूर्व उपनगरात ) गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी संघ सतत्याने उत्सुक आहे. कोणी इच्छित प्रायोजक ( स्पोन्सर्स ) असतील तर स्वेच्छेने पुढे यावे स्वागत आहे.

!!एकमेकां सहाय्य करू !अवघे धरू सुपंथ!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *