
प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयात बिनशेती विभागात दलालांचा फारच सुळसुळाट झाला असून मर्जीतले 3 दलालाने दर पाडून कामे घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे अन्य तमाम दलाल हैराण झाले आहेत. त्यामुळे दलालांमध्ये खटके उडतानाचे चित्र पहावयास मिळते.
या बाबत अधिक माहिती अशी की, वसई तहसील कार्यालयातील बिन शेती विभागात सर्रास कामे दलालांच्या माध्यमातून होताना दिसतात. दलालांचा भयंकर सुळसुळाट झालेला आहे. सर्वसामान्य नागरिक काम घेऊन गेल्यास त्यांचे काम होत नाही. अधिकाऱ्यांना ही दलालांच्या माध्यमातून पैसे मिळतात त्यामुळे अधिकारी सर्वसामान्य लोकांचे काम करीतच नाहीत.
भूखंड बिनशेती करण्याकरिता प्रती फूट ४ रुपये हा तहसीलदार यांचा दर आहे तर ईतर अधिकारी प्रती फूट २ रुपये घेतात. दलालांकडून लाचेची रक्कम अधिकारी घेतात. सध्या मर्जितले 3 दलालाचे नाव जास्तच चर्चेत आहे. त्याने आपली किंमत पाडून टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे अन्य दलाल या मर्जीतले 3 दलाल याच्यावर भडकले आहेत व त्यांचे खटके उडतानाचे चित्र पहावयास मिळते. मर्जीतले हे 3दलाल किमान १० तास तहसील कार्यालयात दिसतो. तसेच हे मर्जीतले दलाल हे या पूर्वी पी. एस. पाटील तहसीलदार असताना त्यांचा मुलगा जयेश पाटील यांच्या सोबत दलाली करताना दिसायचा. किरण सुरवसे व उज्वला भगत यांच्या काळात मर्जीतले दलालाने लाखोंची काळी माया जमविली ? या मर्जी तले दलालांची सक्त वसुली संचालनालयातर्फे चौकशी व्हावी, भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत बहुजन विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले. तसेच लवकरच मर्जीतले दलालांची नावे पुढील अंकात जाहीर केले जातील