

डहाणु(१/६/२०२०) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत खासदार श्री गावित साहेब मार्गदर्शन करीत होते ,तेव्हा त्यानी सिंचन विहीरीना प्राधान्य द्यावे असे अशी सुचना आधिकारी यांना केली
बैठक सह जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार साहेब ( उपविभागीय महसुल अधिकारी विभाग डहाणु ) ह्याच्या उपस्थित पार पडली. आमदार श्री श्रीनिवास वनगा साहेब उपस्थित होते त्यानी अनेक सुचना केले.
डहाणू तालुक्यात वेगवेगळ्या खात्या अंतर्गत ४८८ कामा मध्ये दिनाक २७/५/२०२० पर्यंत ४४२९ मजुरानी काम केले.
तलासरी तालुक्यात २९२ कामा मध्ये १४३१ मजुरानी काम केले पालघर जिल्ह्यात २७१७ कामा मध्ये ४८९६४ मजुराना रोजगार उपलब्ध झाला.
रोजगारान पासुन कोणालाही वंचित ठेवु नका , जो मागेल त्याला काम द्यावे अशा सुचना खासदार राजेंद्र गावीत साहेबांनी दिले.
मा खासदार श्री राजेंद्र गावित साहेबांनी पुरवठा अधिकारी कडुन AAY- PHH – APL – AATM nirbhar योजनांचा आढावा घेतला.
ज्याच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबाना प्रत्येकी माणसे पाच किलो तांदूळ वितरण चालु असल्याची माहीती डहाणु पुरवठा अधिकारी यांनी माहीती दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना बाडा पोखरण पाणी योजना लवकर पूर्ण करण्यासाठी सुचना केले.
वनविभाग ,सा.बा. विभाग ह्यांचा कामाचा आढावा घेतला.
बैठकीला शिवसेना पालघर लोकसभा सह-समन्वयक केदार काळे ,डहाणु वनविभाग उप वनसंरक्षक श्री. वि.ज. भिसे,डहाणु तालुका तहसीलदार श्री. सारंग साहेब साहेब , उपविभागीय आधिकारी एम. जी.पी. श्री.भिमराव खताळ , डहाणु गटविकास आधीकारी श्री.बी. एच.भरक्षे , डहाणु पुरवठा आधिकारी श्री.व्ही.एस.वागदे, सा.बा.उपविभागाचे श्री.वसंत खसावत , श्री.आ.क.संखे हे उपस्थित होते .