
मिरा भाईंदर मधील महात्मा फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाचा दणका!
पुढील ७ दिवसात सर्व रुग्णांचा तपशील सादर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा
युवक काँग्रेस चे दीप काकडे आणि युवक काँग्रेस टीम च्यां पाठपुराव्याला हळू हळू यश मिळताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात दीप काकडे यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी डॉ श्री कैलास पवार, सिव्हील सर्जन, ठाणे जिल्हा यांची सदर विषयात झालेल्या घोटाल्याची कसून चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दीप काकडे यांनी मनपा वैद्यकीय विभागाच्या हवाल्याने सादर केलेल्या अर्जनुसर साधारण ८५१ कोविद रुग्णांना भक्तिवेदांत रुग्णालय, फॅमिली केअर रुग्णालय, थूंगा रुग्णालय, चिरायू रुग्णालय आणि कस्तुरी रुग्णालय यांनी जाणूनबुजून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा उपयोग कोविढ उपचारांसाठी करू दिलेला नाही. यात रुग्णालयांनी रुग्णांकडून तबबल ₹१० कोटी वसूल केले आहेत असे वैद्यकीय विभाच्या माहिती अनुसार समजते. युवक काँग्रेस चां असाही आरोप आहे की ह्या व्यतिरिक्त देखील आणखी ७००-८०० रुग्ण शहरात आहेत ज्यांना ह्या योजनेचा फायदा मिलन अपेक्षित होत कारण ते वर नुं केलेल्या अंगीकृत रुग्णालयात कॉविड चां उपचार घेत होते.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एप्रिल महिन्यात सदर विषयात चौकशी साठी समिती गठीत केली असून जिल्हा शल्य चिकित्सक श्री कैलास पवार सदर विषयात कारवाई साठी नेतृत्व करीत आहेत.