
वसई (प्रतिनिधी):३१ मे २०२० रोजी सागर शेत पेट्रोल पंप येथे गटाराचे काम महानगरपालिका प्रभाग समिती आय ने सूचित केलेले ठेकेदार मे. श्रेयस इंटरप्राईजेस, विरार (श्री.योगेश जोशी)यांनी सुरू केले होते..जे काम अद्यापही चालू आहे.. परंतु महानगरपालिका बांधकाम विभागाचे श्री प्रकाश साटम यांच्या वरदस्त असल्यामुळे हे काम अत्यंत निष्काळजीपणे सुरू आहे.. त्यात कोणत्याही प्रकारची काळजी ठेकेदार श्री योगेश जोशी यांच्या कडून घेतली जात नाही आहे.. त्याचाच दुष्परिणाम असा की गटाराच्या खोद कामामुळे रहदारीचा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.. व पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे.. परंतु त्याबाबत कोणतीही माहिती अथवा सूचना फलक ठेकेदार यांच्या कडून लावण्यात आले नाही.. त्यामुळे नागरिकांची प्रचंड हेळसांड होत आहे..याबाबत युवाशक्ती एक्सप्रेस च्या माध्यमातून लोकांच्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या… परंतु महानगरपालिका ने याकडे दुर्लक्ष केले असून ठेकेदार याने आपल्याच घमंडी तोऱ्यात हे काम सुरू ठेवले आणि त्याचाच दुष्परिणाम असा झाला की काल १३ जून रोजी एका चार चाकी वाहनाचा ह्या गटारात पडून अपघात झाला… ही सर्वस्वी महानगरपालिका व ठेकेदार यांची जबाबदारी आहे.. त्या बाबत ही बातमी पुन्हा एकदा युवाशक्ती एक्सप्रेस ने दिली असून महानगरपालिका व ठेकेदार यांचा स्वार्थी व निष्काळजीपणा उघड केला आहे.. त्याची दखल आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उपजिल्हाध्यक्ष श्री फिरोज इब्राहिम खान यांनी घेतली असून माजलेल्या व निष्काळजी ठेकेदार यांचे ठेके रद्द करण्याची मागणी महानगरपालिका प्रभाग समिती आय चे प्रभारी सह आयुक्त श्री सुभाष जाधव यांच्याकडे केली आहे