वसई विरार शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामदास वाघमारे यांनी महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मधिल गैरसोयीबाबत वारंवार आयुक्त बी. जी. पवार तसेच संबंधित आरोग्य अधिकारी यांना लेखी निवेदन दिल्यानंतरही काही ठोस पावले उचलली जात नव्हती. दिनांक १३/०९/२०१९ रोजी सदर विषयाबाबत धरणे आंदोलनाचा लेखी इशारा देण्यात आला होता.ठरल्याप्रमाणे दिनांक १७/०९/२०१९ रोजी सकाळी ११वाजता मोरेगाव नागिनदास पाडा येथिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते चालत महानगरपालिका हॉस्पिटल येथे पोहचले, दरम्यान सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आंदोलनात असंख्य सामान्य जनतेने सहभाग घेतला होता.
.महानगरपालीकेच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेटून देण्यात आलेल्या निवेदनातील सर्व मागण्यांबाबत चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
काँग्रेस पक्षातर्फे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर घेण्यात आलेल्या या धरणे आंदोलनातील जवळ जवळ सर्वच मागण्यांची पूर्तता करण्यात आल्याचे तसेच काही प्रलंबित मागण्या लवकरच महासभेत ठराव पास करुन पुर्ण करण्यात येणार अशा आशयाचे पत्र काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रामदास वाघमारे यांना आज दिनांक १२/१२/२०१९ रोजी देण्यात आले.सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण विषयावर काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव कॅप्टन नीलेश पेंढारी जी, वसई विरार शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष श्री ओनिल अल्मेडा साहेब, जिल्हा उपाध्यक्ष जयहिंद यादव, बिपीन कुटिन्होजी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अर्शद डाबरेजी, युथ काँग्रेस अध्यक्ष संजय मीनाजी तसेच अन्य महिला पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते यांनी अभूतपूर्व सहकार्य केले आणि पुन्हा एकदा काॅग्रेसका हाथ आम आदमीके साथ हे दाखवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *