
पुणे : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हीच जीवनमूल्ये मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे अभिवादन करण्यात आले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव व उपाध्यक्ष इस्तियाक बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी राहुल तांबे, हरीश लडकत, बाळासाहेब चव्हाण, अयाज शेख, दिनेश अर्धाळकर, महेंद्र लालबिगे, अतुल जाधव, फरीद पटेल, नईम बाबा शेख, शब्बीर शेख, अर्चना वाघमारे, लावण्या शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
