महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

पुणे : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हीच जीवनमूल्ये मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास आरपीआय मातंग आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप कांबळे, सुरेश राजगे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पुणे शहर उपाध्यक्ष किरण जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीत सकट, सतीश कांबळे, डॉ. तेजस राजगे, अनिल शिंदे, गोपी खेत्रे, शेखर चक्रनारायण, ज्ञानेश्वर मोरे, जेकब डेविड, डेंजिल मेंडोसा, चॅस फर्नांडिस, सादिक शेख, पंढरीनाथ कांबळे, सॅम घंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *