शिवसेनेचे मोहसीन शेख यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

महापालिका कार्यालयामधील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे हे महापालिका कार्यालयात बसून बहुजन विकास आघाडी पक्षाचे कार्य करीत आहे. आरोग्य विभागात ओले आणि सुखे कचऱ्याचे डबे मिळावेत यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे यांनी ओले आणि सुखे कचऱ्याचे डबे देण्यास नकार दिला होता. त्याचे कारण विचारले असता आम्हाला कुणालाही ओले आणि सुखे कचऱ्याचे डबे देता येत नाहीत असे उलट उत्तर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे यांनी दिले होते. दि. २ मार्च २०२१ रोजी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता मुनाफ बलोच यांच्या वाढदिवसाला त्यांचे वडील तत्कालीन विरार नगरपरिषदेचे नगरसेवक रेहमान बलोच या दोघांना ओले आणि सुखे कचऱ्याचे डबे कोणत्या आधारावर दिले गेले? असा सवाल केला आहे. यादिवशी मुनाफ बलोच यांचा खाजगी बंगला बलोच पॅलेस येथे रहिवासी संकुलांना १०० ओले आणि सुखे कचऱ्याचे डबे वाटण्यात आले याचे पुरावा सुद्धा आहेत असे म्हणत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे यांची भेट घेतली आणि ओले आणि सुखे कचऱ्याचे डब्ब्याविषयी विचारणा केला असता मुकणे त्यांनी चक्क नकार दिला. तेथून काढता पाय घेताच मुनाफ बलोच व त्यांचे वडील रहेमान बलोच यांना वसंत मुकणे यांनी फोन करून झालेल्या चर्चेची माहीती दिली हे अधिकार त्यांना कुणी दिले असा सवाल मोहसीन शेख यांनी केला असून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ते कठोर शासन करावे अशी मागणी वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना ईमेलद्वारे
दिलेल्या निवेदनात केली आहे. मोहसीन शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनाही निवेदनात ईमेलद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *