

वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.कृणाल मनोज गुप्ता असे या दुदैवी मुलाचे नाव आहे.तो आपल्या आईवडीलांसोबत पापडी बुद्धवाडी येथे राहतो.
वसई पश्चिम येथील पापडी तलावावर हि घटना घडली आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता शाळेतून आल्यावर कृणाल तलावावर गेला होता.तलावाच्या काठावरील तारपावर चढून खेळत असताना पाय घसरून तो पाण्यात पडला व बुडाला.स्थानिक नागरिकांनी त्याचा पाण्यात शोध घेत त्याला पाण्याबरोबर काढून नजीकच्या डिसोजा रूग्णालयात नेले.मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
वसई पापडी येथील तलावात गणेश विसर्जनासाठी पालिकेने हा तारपा ठेवला होता.गणपती विसर्जन झाल्यानंतर पालिकेकडून हा तारपा बाहेर काढणे गरजेचे होते.पालिकेने तो तलावातच ठेवल्याने काही मुले त्यावर चढून खेळत होती.तलाव परिसरात सुरक्षा रक्षकही ठेवला नसल्याने हि घटना घडल्याचा आरोप नागरीक आता करताहेत.