(दि.२३ राजेश जाधव) मैत्री संस्था यांच्या वतीने विरार येथे महापुरुषांच्या विचारांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळि प्रमुख वक्ते संविधान प्रचारक अभ्यासक विशाल हिवाळे यांनी आपले विचार मांडताना भारतीय संविधानाने आपला देश चालत आहे.सर्व नागरिकांना शिक्षणात समानता, सर्वांना आपल्या धार्मिक श्रद्धा आणि उपासना यांचे अधिकार संविधानाने दिले आहेत.आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहेत.सर्वांना समान मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे.या अधिकाराने आपण आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून सरकार निवडून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे अधिकार संविधानाने दिले आहेत.संविधानात दोष नाही तर संविधान राबविणारे त्यांच्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करत असतात एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने संविधान जागृती करण्याचं काम केले पाहिजे असं मत विशाल हिवाळे यांनी व्यक्त केले.तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी आजच्या परिस्थितीत महापुरुषांचे विचार भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कसे पुरक आहेत आणि हे सर्व महापुरुष ज्यांनी आपली संपूर्ण हयात सर्वच जाती धर्माच्या हितासाठी घालविली त्यांना एका विशिष्ठ जातीच्या चष्म्यातून बघणे चुकीचे आहे.या महापुरुषांच्या विचारांमध्ये समाजाच हित आहे ते विचार सर्वांनी आत्मसात करून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केलं.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूरज भोईर यांनी आपल मत मांडताना सर्व पदाधिकार्यांनी समाज जागृती करुन महापुरुषांचे विचार घरोघरी कसे पोहोचतील यासाठी काम करावं असं आवाहन केलं तसेच मैत्री संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता शिबीर राबवून त्यातून नवोदित कार्यकर्ते निर्माण करून सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक विषयांवर सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध रहावे असे आवाहन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केल.तर प्रत्सावना मैत्री संस्थेचे सचिव राजेश जाधव यांनी मांडली.यावेळी लेखक संदीप महाडिक, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा जावळे , कवी लेखक सुनील असनकर, पालघर जिल्हा अध्यक्षा किरण म्हात्रे, सल्लागार प्रज्योत मोरे, सचिव फिरोज खान ,विजय रणदिवे, अंजली साखरे , यांनी आपली मतं व्यक्त केली.या कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये पोलिस कुटुंब कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रताप दुपारे, तेजस दुपार,रजनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा रजनी गडा, प्रकाश गडा, पत्रकार मायकल जाॅन , पत्रकार घनश्याम आंबोरकर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय गोडबोले, संतोष भोईर, वनिता तोंडवलकर, आसिफ शेख यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *