

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या “ब” प्रभाग समिती मधील वॉर्ड क्रमांक 39 प्रगतीनगर हायटेंशन रोड येथील सर्व रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक विभाग अध्यक्ष श्री. सैनिक मांगले यांनी सन 2016 पासून सातत्याने महापालिका आयुक्त. सभापती.यांच्याकडे पाठपुरावा केला होता.पर्यायी 5 दिवसांचे आमरण उपोषण देखील केले होते. अलीकडेच 15 दिवसापूर्वी मनसेच्या मुख्य पदाधिकारी यांनी “ब” प्रभाग समिती कार्यलयात उपायुक्त यांची भेट घेऊन लवकर काम सुरु करण्याची मागणी केली होती त्या पार्श्ववभूमीवर महापालिका प्रशासनाने योग्य ती दखल घेत.सर्व रस्त्यांचा एकंदरीत सर्वे करून अंदाजे 5 लाखाचे टेंडर मंजूर सर्वत्र विजेचे पोल लावण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपारा शहराचे सचिव श्री. राज नागरे यांनी जाऊन पाहणी केली. तसेच सर्व सामान्य जनतेसाठी झगडणारे मनसे विभागअध्यक्ष श्री.सैनिक मांगले. महापालिका उपायुक्त श्री. पंकज भुसे तसेच इंजिनिअर कु. प्रतिक यांचे आभार मानले.तसेच आता पोल जवळ येऊन उभे राहून फोटो काढुन कुणीही खोटे श्रेय घेतले तरी चालेल परंतु गोरगरीब जनतेला या प्रभागात दिवाबत्तीची सोय करून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो हीच आमच्या कामाची प्रमाणिक पोच पावती आहे असा टोला देखील राज नागरे यांनी लगावला
