

दि.३१/०८/२०१९ रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या व्दितीय व तृतीय वर्ष विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ.पायल चोलेरा यांनी महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी यांच्या सहकार्याने विशेष अभ्यास दौरा आयोजित केला होता.
अभ्यास दौर्याची सुरूवात महाराष्ट्र ज्युडिशियल अॅकाडमी म्हणजेच महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी च्या मनमोहक वास्तुच्या दर्शनाने झाली.
एका वर्षाच्या विक्रमी वेळेत निर्माण करण्यात आलेली सुंदर कलाकृती पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
२७/०६/२००९ रोजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सदर वास्तुंचा उद्घाटन सोहळा पार पडला.
१० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात न्यायालयीन अकादमीतून अनेक हिरे बाहेर पडले.
सातत्यपूर्ण नेत्रदिपक कामगिरीमुळे अकादमीस विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
महाराष्ट्रातील किंबहुना देशातील न्याय व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्र ज्युडिशियल अकादमीस प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि कामकाज जाणुन घेण्याची संधी दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाली.
अकादमी मधील अॅडिशनल डायरेक्टर श्री उदय शुक्ला सर यांनी.
न्याय व्यवस्था, तीची कार्यपद्धती
न्याय व्यवस्थेतील प्रत्येक घटकांचे महत्त्व आणि योगदान या बद्दलची विश्लेषणात्मक माहिती दिली.
साक्षिदार हे न्याय व्यवस्थेचे “डोळे” आहेत. घडलेली घटना आणि त्याबाबतची माहिती योग्य रितीने न्यायालयासमोर आणणे गरजेचे आहे. सर्व सामान्य माणसांची जागृकता हाच खरा न्याय व्यवस्थेच्या मजबुतीकरणाचा भक्कम पाया आहे.
फाॅरेन्सिक ट्रुथ आणि रियल ट्रुथ यामधील दरी दुर करणे हे न्याय व्यवस्थेचे आद्य कर्तव्य आहे असे त्यांनी म्हटले.
जाॅईंट डायरेक्टर श्री.सुधाकर याररागडा यांनी “क्रिमिनल जस्टिस” या विषयांवर दृक श्राव्य माध्यमातून सविस्तर माहिती दिली.
अगदी पोलिस स्थानक व्यवस्थापक,तक्रार, दखलपात्र-अदखलपात्र,स्टेशन डायरी, पंचनामा, पोलिस रिपोर्ट ते ट्रायल, बेल,अपील,रुल आॅफ लाॅ ईत्यादि बाबत इंत्यंभुत माहिती दिली.
तदनंतर डेप्युटी डायरेक्टर कुनवरसिंह सिंघेल यांनी विधी क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी,
न्याय म्हणजे नेमके काय?
कायद्यांवरील प्रभुत्व,कायद्याचे योग्य विश्लेषण आणि योग्य कार्यपद्धती बाबत माहिती दिली.सरतेशेवटी
चर्चा सत्रांची सांगता प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाली.
दांडेकर विधी महाविद्यालयाच्या वतीने प्रोफेसर दिशा तिवारी,प्रो.उत्कर्षा जुन्नरकर, प्रो.राधा मित्रा,प्रो.विनोद गुप्ता आणि प्रो.प्रिया तांडेल यांनी महाराष्ट्र ज्युडिशियल अॅकाडमीचे विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले.
यापुढेही विविध विषयांवरील मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून आम्हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घालावी असे विद्यार्थ्यांनी सांगितले.