

नालासोपारा(प्रतिनिधी)-वसई विरार क्षेत्रात अनेक समाजहित उपयोगी कार्य करून आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर वेगळी ओळख तयार करून तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रचंड अभ्यासू.संवेदनशील.आणि आक्रमक नालासोपारा शहरसचिव श्री.राज नागरे यांची कार्यशैली पाहून पोलीस बॉईज संघटनेच्या वसई तालुकाध्यक्ष पदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.सर्वसामान्य नागरिकांबरोबरच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी. कर्मचारी.त्यांचे पाल्य यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यावर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वसई तालुक्यातील.तुलिंज.नालासोपारा. वालीव.अर्नाळा. माणिकपूर.वसई. विरार या पोलीस ठाण्याबरोबरच नव्याने अस्तित्वात येणाऱ्या मीरा भाईंदर आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस बांधवांच्या हितासाठी एका झुंजार नेतृत्वाची नितांत गरज होती. गेली अनेक वर्षे पोलीस मित्र म्हणून पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी कौटुंबिक व मैत्रीचे नाते तयार करून वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असलेल्या असलेल्या राज नागरे यांच्याकडे पोलीस संघटनेची कायम दृष्टी होती.त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राहुल दुबाळे.महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री.योगेश कदम.यांच्या आदेशानुसार मुंबई युवक आघाडीचे अध्यक्ष श्री.रितेश गोसावी.पालघर जिल्हाअध्यक्ष श्री.दिनेश गोसावी.वसई तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष श्री.मनीष जयस्वाल यांच्या सूचनेनुसार श्री.राज नागरे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.यावेळी त्यांचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.त्यांच्या या निवडीमुळे सामान्य नागरिक व पोलीस प्रशासनात आनंदाचे वातावरण तयार झाले असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
