

वसई ( प्रतिनिधी ) – पालघर दौऱ्यानिमित्त बुधवार दिनांक 17.2.2021 रोजी वसईत झालेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला . अध्यक्षांच्या आगमनानंतर वसई पारनाका येथे प्रथम पेट्रोल डिझेल एलपीजी घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपात ” सबके साथ विश्वासघात ” या नावाने आंदोलन करण्यात आले . यावेळी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चुली पेटून त्यावर भाकऱ्या भाजून दरवाढी विरुद्ध निषेध व्यक्त केला.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य कुटुंबाला या दरवाढीमुळे चूल वापरण्याची वेळ आली आहे. असे निदर्शनास आणून दिले प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नांना संतप्त महिलांनी प्रखर भाषेत उत्तर देऊन जगणे मुश्किल करणाऱ्या केंद्र सरकार वर टीकास्त्र सोडून आपला रोष व्यक्त केला.
आंदोलनानंतर काँग्रेस भवन येथील सभागृहातील व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित युवक काँग्रेसच्या मेळावा यांचा आरंभ झाला.
संदीप फिगैर यांनी प्रमुख पाहुणे व पदाधिकार्यांची ओळख करून दिली. प्रास्ताविक भाषणात वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी अध्यक्षांचे स्वागत केल्यानंतर या मेळावा मेळावा चा उद्देश सांगितला ते भाषणात म्हणाले की केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गरीबी वाढली युवक बेरोजगार झाले नोकरी मिळणे हे युवकांचे स्वप्नच राहिले महागाईमुळे महिलांचे घरचे आर्थिक बजेट कोलमडले व अजूनही स्थिर होत नाही शेतकरी आंदोलनाला जवळपास 85 दिवस होऊनही त्यांना अद्यापही मिळत नाही कोरोनामुळे अगोदरच संत्रस्त असताना पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस दरवाढीमुळे देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून ती रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.
पालघर दौऱ्यासाठी आलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ना कार्यक्रमाच्या वेळापत्रकाचे बंधन असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणात आगामी महानगरपालिका निवडणूक लढणे पक्षवाढीसाठी मोर्चेबांधणी करणे पक्षातील विविध प्रश्नांवर चर्चा संवाद यावर आपली मते थोडक्यात मांडली.
मेळाव्याच्या अखेरीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना उद्देशून पक्षवाढीसाठी घेण्याच्या जबाबदा-या विषयी सूचना दिल्या . पक्ष एकसंघ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले. सर्वांनी एकजुटीने काम केले तर आपला विजय निश्चित आहे. असे सांगून भाषणाचा समारोप केला.
क्क्रिस्टल नाडर यांनी उपस्थितांचे आभार मानले नंतर मेळावा संपन्न झाला. वसई विरार नालासोपारा येथील बहुसंख्य युवक कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते . दरवाढीविरुद्धचे आंदोलन आणि युवक मेळावा यशस्वी करण्यासाठी वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रिज किशोर दत्त , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य सावळेकर , वसई विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील अलमेडा , डॉमनिक डिमेलो , पुष्कराज वर्तक , प्रकाश पाटील , प्रवीणा चौधरी , राम पाटील बिना फुरताडो , रतन तिवारी , हर्षद डबरे , अनिकेत पाटील , संदीप कनोजिया सुजय खैरे , अंकिता वर्तक , प्रतीक वर्तक , फेलिक्स पांगे उपस्थित होते .

