
वसई ( प्रतिनिधी ) समाजातील सर्व सामान्य घटकापर्यंत पोचण्यासाठी आपण नव्या नव्या माध्यमाचा वापर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. सोशल मीडिया हे असे एक अत्यंत व्यापक माध्यम उदयास आले आहे . आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे राज्य, विभाग, व जिल्हा समाज माध्यम समन्वयकच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात कोकण विभागीय मुख्य समन्वयक पदी अभिजीत पाटील , वसई विरार शहर मुख्य समन्वयक पदी अंकुश पांडे तर पालघर जिल्हा सोशल मीडिया जिल्हा समन्वयक पदी मोईन शेख यांची निवड झाली आहे . कोकणात व पालघर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी या नियुक्त्या महत्वाचा ठरल्या जात आहेत , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे व प्रवीण बिराजदार यांच्याकडून या नियुक्त्या झाल्या असून वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक , पालघर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर व काँग्रेस कार्यकर्ता कडून या नियुक्त्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.