
आशासेविकांना न्याय देणारच

वसई
तुटपुंज्या मानधनावर सरकारी योजना वसई विरार मनपा क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी वसई विरार जिल्हा भाजपा सरचिटणीस श्री. उत्तम कुमार नायर यांच्या नेतृत्वात विश्वकर्मा हाॅल,वसई येथे पार पडला.
महिलांवरील अत्याचाराविरोधात लढणाऱ्या भाजपा नेत्या सौ. चित्रा वाघ ताईंनी मोदी सरकारने महिलांकरीता राबविलेल्या योजना, कोविड काळात मोफत अन्नधान्य, मोफत लसीकरण, जनधन खात्यावर दरमहा ५०० रू मदत, तिन तलाक कुप्रथा बंदीचा कायदा, आवास योजना, उज्वला गॅस, प्रधानमंत्री आवास योजना अश्या कार्यातुन महिलांचा सन्मान व विकास हेच मोदी सरकारचे धोरण असल्याचे सुतोवाच केले. मोदी सरकारने गेल्या ८ वर्षात केलेल्या जनकल्याणकारी कामांची माहिती दिली.
आशा सेविकांना न्याय देण्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- लोकनेता देवेंद्र फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे चित्राताईंनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमात नाशिक भुमीकन्या व अनेक पुरस्कारांनी सन्मानित आंतरराष्ट्रीय महिला बाॅडी बिल्डर सौ. स्नेहा कोकणे पाटील यांनी छत्रपती शिवराय व राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करून स्वानुभावातुन स्वयंस्फुर्ती व आत्मविश्वासाने जगण्याचे धडे उपस्थितांना दिले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे जिद्दीने हाती घेतलेले कार्य यशस्वी होतेच असे मार्गदर्शनपर भाषण केले.
वसई विरार जिल्हा भाजपा सरचिटणीस श्री. उत्तम कुमार, उपाध्यक्ष श्री. मनोज पाटील व महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. प्रज्ञा पाटील यांनी आशा सेविकांचे प्रश्न व समस्या मांडल्या, कुठल्याही परिस्थितीत जमेल ती मदत करण्यास तत्पर असल्याची ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमास ३०० आशा सेविका उपस्थित होत्या. सत्कार कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा श्रीकुमारी, सरचिटणीस रमेश पांडे व ईतर पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
भाजपा पदाधिकारी श्री. गोपाळ परब यांनी सत्कार समारंभास उपस्थित सर्व आशा सेविका व मान्यवरांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमात भाजपा किसान मोर्चा चे श्री. सुभाषजी भट्टे, भरत राजपुत, महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी सकीना नुरानी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कल्पेश नाईक, युवा जिल्हा सचिव प्रतिक चौधरी, सर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.