
दि.१ राजेश जाधव
छत्रपती शिवरायांच्या विचारांवर व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत हिंदवी स्वराज्य संघटना आयोजित महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त शिव सन्मान, जिजाऊ सन्मान, व महाराष्ट्र सन्मान २०२२ पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.३० एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता बाबू गेनू स्मारक,के.ई.एम हाॅस्पिटल समोर ,परळ याठिकाणी पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आशा शेलार (प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री) , डॉ.प्रविण निचत (होप फाऊंडेशन) , डॉ.सागर नटराजन (प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक) , अभिजित राणे (कामगार नेते व संपादक दैनिक मुंबई मित्र) आशू सुरपूर ( सिने अभिनेत्री), संतोष वराडकर (प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई)हे उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.नंतर मैत्री संस्थेचे सचिव राजेश जाधव यांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाची प्रस्तावना मैत्री संस्थेच्या महिला पदाधिकारी शीतल पाटील यांनी केली.तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्री संस्थेच्या पालघर जिल्हा उपाध्यक्षा तेजस्विनी डोहाळे यांनी केले.या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक,कला ,क्रिडा तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां पुरुषांचा शिव सन्मानाने तर महिलांचा जिजाऊ सन्मान तसेच महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव व कार्याध्यक्ष सूरज भोईर यांनी केले.या कार्यक्रमाला मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती,जय महाराष्ट्र पत्रकार संघ यांचे विशेष सहयोग लाभला