
पालघर(राजेश चौकेकर) : संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून काम सुरू आहे. या कामात कोणी अडथळा किंवा खोटी बदनामी आणि सोशल मीडिया वर अपमानजनक पोस्ट टाकल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करू असा इशारा राज्य समन्वयक तथा समाजभूषण नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी दिला आहे. सरपंच हा ग्राम विकासातला प्रमुख घटक आहे. यांना विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी सरपंच सेवा संघ महाराष्ट्रभर कार्य करीत आहे. यासाठी आमचे मार्गदर्शक सरपंच नेते यांच्यावर कोणी खोटी बदनामी आरोप करणाऱ्याची गय केली जाणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा जो विरोधकांनी प्रयत्न सुरू केला आहे तो थांबवा अन्यथा वेगवेगळ्या ठिकाणी अब्रूनुकसानीचे दावे महाराष्ट्रभर दाखल करू असे,ऑनलाईन झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी रविंद्र पवार, भाऊ मरगळे, रविराज गाटे, नवनाथ शिंदे, सतिश कानवडे, संजय वाघमारे, जयश्री शुक्ला, विठ्ठल गिरी, आबासाहेब गवारे, राजेश चौकेकर, भाऊसाहेब गोहाड, अमोल शेवाळे, भाऊसाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात सरपंच संघटन मजबूत करणारे पहिले नेतृत्व म्हणजे बाबासाहेब पावसे पाटील यांचे नाव अग्रेसर आहे. संगमनेर राज्य सरचिटणीस सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रभर सरपंच सेवा संघाचे कामकाज समन्वयकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना आदर्श करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही मत वाघमारे यांनी व्यक्त केले. भविष्यात राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करणार असल्याचे मत या वेळी वाघमारे यांनी मांडले.
