

पालघर दिनांक २२/६/२०२० MSEDCL महावितर कंपनी ने जे एप्रिल – मे – जुन २०२० चे वीजबिल एकत्र दिले आहे ,ते खुप मोठे आहे ,लॉकडाउन मुळे रोजगार बुडालेला आहे ,काम धंदे बंद होते ,पगार नाही ,नोकऱ्या सुटलेल्या आहेत अशा वेळेस एकदम तिन महीन्याचे वीज बिल भरणे शक्य नाही ,म्हणून त्याचे हप्ते पाडुन द्यावे व हप्त्यान वर व्याज लाऊ नये अशा सुचना खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेबानी MSEDCL च्या आधिकार्याना केल्या .
पालघर येथे सर्व व्यापारी असोसिएशन व वीज ग्राहकानी खासदार गावीत साहेबान कडे वीज बिलान बाबत तक्रार केली असता खासदारानी MSEDCL आधिकारी व व्यापारी प्रतिनिधी व वीज ग्राहकांची सयुक्तिक बैठक आयोजीत केली होती तेव्हा वीज ग्राहकांच्या तक्रारी एकल्यावरवरील सुचना केल्या .
बैठकीला काही वेळ चिफ इंजिनियर कल्याण श्री दिनेश अग्रवाल साहेब उपस्थित होते .
अधिक्षक अभियंता महावितर पालघर च्या श्रीमती किरण नागावकर मॅडम ह्यानी वीज ग्राहकांच्या समस्या बद्दल सविस्तर माहीती दिली तसेच
वीजवापराचे तीन महिन्यांचे वीजबिल अचूकच;
वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त भुर्दंड नाहीअसे म्हणाल्या
लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा
अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये .
कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते.
पाठविण्यात आलेली सरासरी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दि. १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. उदा. ग्राहकांना जूनमध्ये ३.०७ महिन्यांचे ३०७ युनिटचे वीजबिल आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी १०० युनिटचा वीजवापर झाला आहे. मात्र जूनच्या बिलातील ३०७ युनिटला थेट ३०१ ते ५०० युनिटचा स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या प्रत्येकी १०० युनिटला ० ते १०० युनिटचा स्लॅब दर लावण्यात येत आहे. याशिवाय ३१ मार्चपर्यंत वापरलेल्या युनिटची संख्या दर्शवून ३१ मार्च 2020 पूर्वी जे वीजदर लागू होत तेच दर लावण्यात आले आहेत. एवढी अचूकता महावितरणने संगणीकृत प्रणालीमध्ये वापरलेली आहे.
वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीजवापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व दि. १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे.
एप्रिल, मे व जून महिन्यांचे वीजबिल वीजग्राहकांना एकत्रित परंतु, स्वतंत्र मासिक हिशोबानुसार देण्यात आलेले आहे. हे तीन महिन्यांचे जूनमध्ये देण्यात आलेले वीजबिल अतिशय अचूक आहे. योग्य स्लॅब व वीजदरानुसार तसेच प्रत्यक्ष वीजवापरानुसारच आहे. एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड या वीजबिलामध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात जाऊ नये तसेच महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या ऑनलाईनद्वारे वीजबिलाच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे.
वीज बिल दुरुस्त करण्यासाठी महावितरण कार्यालयात गर्दी होत आहे ,म्हणून महावितरण कंपनीने संपूर्ण पालघर जिल्ह्यात वीज बिल दुरुस्त करण्यासाठी अनेक केद्र तात्पुरती सुरु करावी अशा सुचना खासदार श्री गावित साहेबानी दिल्या ,तसेच वीज बिल भरले नाही म्हणून ग्राहकाची विज जोडणी तोडु नये .
समुद्र किनारी असलेल्या गावान मध्ये हवामाना मुळे वीज वाहक तारा व इत्तर उपकरणे लवकर खराब होतात ,तसेच वादळा मुळे व वाऱ्यामुळे अनेक वेळा तारा तुटून वीज बंद होते ,म्हणून अशा गावाना जमिनीखालुन (अंडरग्राउंड ) केबल टाकाव्यात अशा सुचना दिल्या ,सातपाटी गावात लवकरच अंडरग्राउंड केबल चे काम पुर्ण होणार आहे .
बैठकीला महावितरण कंपनीचे एक्झेक्युटिव्ह इंजिनिअर पालघर डिव्हिजन चे श्री प्रताप माचीये ,शिवसेना पालघर ,सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व पदादिकारी ,समाज सेवक वीज ग्राहक उपस्थित होते