महापालिकेचे जाहिरात धोरण, नियम बार मालकांनी धाब्यावर बसवलेत.

विरार पश्चिम मधील संतापजनक प्रकार.

शाळा व महाविद्यालय परिसरात 100 मीटर पर्यत तंबाखू जन्य पदार्थ व मद्य विक्री तर बंदी आहे. त्यावर उपाय व तरुणाई ला मद्या कडे आकर्षित करण्यासाठी बार मालकांनी नवीन शक्कल शोधून काढली आहे.
महापालिकेच्या आशीर्वादाने विरार पश्चिम येथील मोठ्या महाविद्यालय व माध्यमिक शाळा असलेल्या संकुलाच्या भिंती वर 10 फूट बाय 30 फूट लांबीचा बार आणि रेस्टोरेंट ची जाहिरात करणारा बोर्ड गेल्या अनेक दिवसापासून झळकत आहे.
वसई मधील दत्तानि मॉल मध्ये सुरू केलेल्या “पंखा फास्ट” या बार ची जाहिरात थेट विरार पश्चिम मधील कॉलेज च्या बाहेर लावण्याचा नेमका उद्देश हा कॉलेज मधील तरुणाई ला आकर्षित करण्याचा आहे हे दिसत आहे. या जाहिरातीत बार मधील इतर विशेष सुविधांची सुद्धा माहिती दिली आहे.
मुळात महापालिकेने या जाहिरातीला परवानगी कशी दिली कॉलेज प्रशासनाने यावर हरकत का नाही घेतली असे अनेक प्रश्न यामधून निर्माण होत आहे.
यावर तातडीने कारवाई करून हे जाहिरात फलक काढून टाकावेत व संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी महापालिका व अर्नाळा पोलीस ठाणे यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *