
संपूर्ण ेदेशात प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे केंद्र सरकारने पुढील तीन वर्षांमध्ये संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक वाहन रस्त्यावर चालतील असे सूतोवाच केले आहे त्या अनुषंगाने आता प्रत्येक ऑटो कंपन्या ह्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचे उत्पादन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहेत त्याच अनुषंगाने महिंद्रा कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालणारी रिक्षा बाजारात आणले आहे . नुकतेच ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांच्या हस्ते एंजल महिंद्रा शोरूम सातिवली येथे विजेवर चालणाऱ्या रिक्षाच्या वितरणाचा सोहळा शानदार पार पडला . यावेळी एंजल आटो चे मालक हेमंत दवे ,महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक अरुण तिवारी, आकाश गायकवाड, मॅनेजर मुकेश तिवारी सेल्स मॅनेजर, जनरल मॅनेजर पवन मेहरा, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मधुसूदन राणे ,शरद जळगावकर, मच्छिंद्र चव्हाण, बाबूलाल राजभर, सुधाकर इंगळे ,महेश कदम, रघुनाथ कळ भाटे, सोहन लाल यादव, विजय मिश्रा, पुतळा जी कदम , रामदुलारे मिश्रा, अरविंद जाधव,इत्यादी पदाधिकारीउपस्थित होते,
सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रातील विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रसाद देण्याचे निश्चित केले आहे . पेट्रोल डिझेल चे वाढते दर व वाढते प्रदूषण यांना आटोक्यात आणण्यासाठी ही पाऊल उचलली आहेत. त्यामुळे आता चार चाकी ,तीन चाकी वाहन ट्रक टेम्पो बस या सर्व वाहनांना बॅटरी वर चालवण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. देशातील विविध महानगरांमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . यासाठी प्रथम शहरात विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यात येते शासनामार्फत विजेवर चालणाऱ्या वाहनांना अनुदान देखील दिले जात आहे भविष्यातील िजेवर चालणार्या वाहनांची गरज लक्षात घेऊन महेंद्र कंपनीने बॅटरीवर चालणारी रिक्षा चे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. या रिक्षांमध्ये दिवसाला 50 रुपयांची वीज लागणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकाला याचा तिपटीने फायदा होणार आहे. या रिक्षासाठी इंजिन नाही .त्यामुळे महिन्याचा पाच ते सहा हजार मेंटेनन्स वाचणार आहे. ही रिक्षा चालवण्याचा अनुज्ञप्ती असणाऱ्या व्यक्तीला ही रिक्षा चालवता येणार आहे. त्यामुळे परवाना, बॅच यांचा खर्चदेखील वाचणार आहे.
तसेच या रिक्षा मुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे .केंद्र व राज्य सरकार मार्फत एक लाख तीस हजार रुपये अनुदान या रिक्षासाठी मिळणार आहे .महिंद्रा कंपनीने या रिक्षासाठी कर्ज सेवा देखील उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना या रिक्षा घेण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. अनेक वैशिष्ट्ये या रिक्षांमध्ये असून ही आरामदायी रिक्षा प्रवाशांना देखील आवडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी या रिक्षा खरेदी करून प्रदूषण कमी करण्यास सहकार्य करावे त्याचबरोबर स्वतःच्या उत्पादनात देखील वाढ करावी. असे आवाहन ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना केले .

