वसई ( प्रतिनिधी) स्त्री संस्कृतीला मारक ठरत असलेल्या प्रथा आधुनिक युगातील स्त्रियांनी झुगारून परिवर्तनवादी व्हावे असे विधान दैनिक आपला उपनगरचे कार्यकारी संपादक डॉ. अरुण घायवट ह्यांनी 8 मार्च जागतिक महिला दिन व आपला उपनगरच्या वर्धापन दिनाच्या दिवशी महिलांना मार्गदर्शन करताना काढले आहे.
काळ 8 मार्च रोजी दैनिक आपला उपनगरच्या 14 वा वर्धापन दिन तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तुषार प्रकाशन वसई ह्यांनी गणपतराव वर्तक क्रीडा भवन चिमाजी आप्पा ग्राउंड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष गोंधळे प्रख्यात चित्रकार, श्याम जुनगरे नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी, श्रद्धा मोरे रिजन चेअर पर्सन लायन्सक्लब, प्रीती सोडा प्रख्यात उद्योजिका, मीना रामास्वामी तसेच भारती पवार कवियत्री लायन दीपक बडगुजर, चरण घायवट तसेच आपला उपनगर च्या संपादिका अनिता घायवट उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन आणि पाहुण्यांची ओळख स्वागत गीत नंतर चरण घायवट ह्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला निरपेक्ष आणि कोणतीही अपेक्षा न करता दरवर्षी हा कार्यक्रम करतो असे त्यानी प्रस्ताविकेत कथन केले. तद्नंतर लायन्स क्लब तर्फे 51 दिव्यांग महिलांना साखर आणि साड्या वाटप करण्यात आल्या. त्यानंतर वर्षभर प्रकाशित झालेल्या दैनिक आपला उपनगरच्या अंकाचे पुस्तक रूपाने प्रमुख अतिथी सुभाष गोंधळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे काम पाहून ते भारावून गेले आणि हे पुस्तक अत्यन्त मोलाचे असून खूप कठीण काम या संपादिकांनी केले असल्याचे त्यानी उपस्थितांना सांगून कौतुक केले. महिला दिन निमित्त उपस्थित महिलांना पत्रकार आनंद गदगी, पद्माकर पडवेकर ह्यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तद्नंतर जागतिक महिला दिन निमित्त महाराष्ट्रातील विविध श्रेत्रात कर्तृत्व निर्माण करणाऱ्या 65 कर्तृत्ववान महिलांना सन्मानचिन्ह, दिवाळी अंक , कैलेंडर देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन डॉ. घायवट ह्यांनी एका लगाच्या रिसेप्शन संबंधी घडलेल्या प्रकारची आठवण करून देत पुढारलेल्या स्त्रीने दांभिक पुरुषाच्या अहंकाराला चपराक लगावून तिने परिवर्तन कसे घडवून आणले या बाबत किस्सा सांगून प्रत्येक महिलेने परिवर्तनवादी व्हावे तेव्हाच खरी स्त्री सन्मानित होईल असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी सुभाष गोंधळे व डॉ. जुनगरे ह्यांचेही समय सूचक भाषणे झाली. लायन श्रद्धा मोरे ह्यांनीही महिलांना उत्तम मार्गदर्शन केले. या दिमाखदार सोहळ्याचे उत्तम सुत्रसंचलन तुषार दिवाळी अंकाच्या उपसंपादीका संध्या गायकवाड ह्यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार चित्रा घायवट ह्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *