
वसई( पुर्वा साळवी ) –दि.१० जुलै शनिवारी नालासाेपारा येथिल हरी बाग हाँल.आंबेडकर नगर मधे
महिला सघंर्ष समिती(रजि.)महाराष्ट्र/यशस्विनी प्रतिष्ठाण.यशस्विनी महिला बचत गट पुरस्कृत नालासाेपारा येथिल महिला बचत गटांना आणि विधवा महिलांना साखर.धान्यकिट.वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालाड येथिल स्वयंसि्ध्दा बचत गटाचे अध्यक्ष श्री आनंद मालाडकर.महिला संघर्ष समितीच्या राष्ट्रिय अध्यक्षा साै.रिना जाधव.वसई महानगर पालिकेतील रुबिना खान.तसेच सा.समाजमनच्या सह.संपादिका पुर्वा साळवी उपस्थित हाेते.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करुन व दिपप्रज्वन करुन करण्यात आली.
नालासाेपारा येथिल काही बचत गटांची जाेडणी महिला संघर्ष समितीने त्याच्या कार्यालयातुन सुरुवात केली.यामधे बचत गटांची जाेडणी करणेसाठी माेलाचे सहकार्य दिलिशा वाघेला.रेणुका जाधव.माधवी यांनी केले. या कार्यक्रमावेळी बचत गटातील सभासद आणि अध्यक्षांनी स्वताचे मनाेगत व्यक्त केले.यावेळी बचत गट.व बचत गटाचे फायदे बचत गटाच्या माध्यमातुन लघऊद्याेग कसे सुरु करायचे यावर महिलांना मार्गदर्शन श्री आनंद मालाडकर सर यांनी केले.उपस्थित सर्व महिलांना स्त्री शक्ती म्हणजे काय यावर पत्रकार/समाजसेविका पुर्वा साळवी यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणेच्या हस्ते सर्व बचत गटांना व विधवा महिलांना धान्य वाटप.व साखर वाटप करणेत आले.