
दिनांक 10 जून 2022 रोजी 1.55 वा सुमारास मांडवी पोलिस ठाणे हद्दीत मौजे नालेश्वर मंदिर जवळ टेम्पररी तारपत्री मध्ये ता. वसई जि. पालघर या ठिकाणी आरोपी प्रकाश उर्फ बुवा तोताराम सोनवणे वय 47वर्षे धंदा -मजुरी रा. गाळ नं. 1 नालेश्वेर मंदिर चाळ, विरार फाटा विरार पूर्व ता. वसई जि. पालघर यांच्या ताब्यात रु.51,350/- किमतीचा 03किलो 200 ग्राम वजनाचा कॅनबीस या वनस्पतीचे शेंडे (गांजा )या नावाचा अमली पदार्थ मिळून आला आहे, त्या अनुषंगाने मांडवी पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.28/2022 अमली पदार्थ औषधे आणि मनोवैज्ञानिक पदार्थ अधिनियम 1985(एन. डी. पी. एस ऍक्ट )कलम 8(क ),20 (ब )||(ब )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुंडे पोलिस उप आयुक्त परिमंडळ -3 मी.भा.व. वि पोलिस आयुक्तालाय श्री. रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलिस आयुक्त विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिवानंद देवकर पोलिस निरीक्षक मांडवी पोलिस ठाणे सहा. पोलिस निरीक्षक /संदीप सावंत पोलिस उप निरीक्षक /आर. एन. सलगरे पोहवा /06166 एस. डी पाटील, पोहवा /07005 जे. पी. मराठे पो. शी /10068 के. व्ही. मोरे. पोशि /14015 ए. पी साळुंखे महिला होमगार्ड पी. ए हेमाडे यांनी केलेली आहे.
