
बहुजन समाज पार्टी द्वारे आठ दिवसापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मा. अनिलकुमार पवार यांना अनेक वर्षे प्रलंबित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महानगरपालिका सोडवत नसल्याने महापालिकेवर बसपा हंडा मोर्चा घेऊन जाणार असल्याचे पत्र बसपा कडून देण्यात आले होते. सदर पत्रावर कार्यवाही करून प्रभाग समिती “क” चे मा. उप अभियंता श्री. प्रदिप पाचंगे यांनी पाणी टंचाई भागात जलवाहिन्या अंथरण्याचा प्रस्ताव तयार केला असून काम लवकरच सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती बहुजन समाज पार्टी चे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी दिली. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणीच जन-सभा घेऊन महापालिका प्रशासनाने मुख्य मागणी मान्य करून नविन पाईप लाईन अंथरण्याचे काम सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. सदर जल वाहिनीचा फायदा प्रभाग समिती “क” अंतर्गत कातकरीपाडा, अंबिका नगर, चंदनसार, कोपरी, शिरगाव, कुंभारपाडा, बरफपाडा येथिल ३००० लोकांना होणार असल्याची माहिती प्रा. डी. एन. खरे यांनी दिली. यावेळी प्रमुख उपस्थिती इरफान शेख, नासीर शेख, तावीज शेख, विकास मोहिते, उमेश पाटील, विष्णू वाघ, नईम ईद्रीसी, जगजितसिंग गरेवाल, रजबअली खान, अली कारीकर, वैभव तायडे, गोविंद शेलार, सुशील सिंग, प्रफुल सोनोने, अक्रम सवालाखे, नदीम शेख, जिशान शेख, असलम सवालाखे, संदीप धुमाळ, सोनू जाधव, प्रदिप यादव, करण गुंमते, आफ्रिदी शेख, सोयल शेख, अल्ताफ शेख, सद्दाम सवालाखे, असलम सवालाखे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


