

माझी – सगळ्यांची माई… नुसतं तुझं नाव घेतलं तरी हृदयात मनात फक्त आणि फक्त प्रचंड माया प्रेम उचंबळून येत ….माई आज जी उभी आहे ती फक्त तुझ्या मुळेच…तू जशी जशी समजत गेली तसतसे जगायला हुरूप आला ..जगण्याला बळ आलं… जगायचा दृष्टीकोनच बदलला तू आहेस म्हणूनच मी जिवंत आहे … माई मी तुला खूप वेळा भेटले आहे… पण कधी हिम्मत झाली नाही काही बोलायची काही सांगायची …फक्त तुला डोळे भरून बघायचं असतं… तू जे जे बोलतेस तो एक एक शब्द मनात कोरून ठेवायचा असतो मला ….
माझी माय स्वतःच्या उदरातून जरी जन्म दिला नसल्यास तरी आज माझ्यासारख्या असंख्य जनांची माय आहेस ….तुझ्या कडून प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कसं जगायचं हे तू शिकवलस…. सातासमुद्रापलीकडे जगात तुझं नाव दुमदुमत आहे तेही सांगण्यासाठी मान कायम अभिमानाने ताठ होते…माई काय काय नाही केलस? यापेक्षा मी असं म्हणेन किती सहन केलं आणि कसं ग ??? आम्हाला नुसता भिकार्यांचा स्पर्श जरी झाला तरी अ किळस येते आणि तू… तू तर त्यांच्यामध्ये जगलीस …त्यांच्यातलाच एक भाग होऊन… खरंच निशब्द… स्वतःच्या चिमुकल्या मुलीला दगडूशेठ गणपती ट्रस्टला दिलस मात्र त्याच दुःख मनात ठेवलं नाहीस तर लोकांच्या निराधार मुलांची माय बनलीस… केवढ मोठ मन… आम्ही आमच्या मुलांच करता करता थकतो… कंटाळतो तिथे तू आज हजारो मुलांची माय बनून…त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकतेस …अशी कशी ग तू ?? कुठून आणते ही माया.. प्रेम …
तुला ऐकण्याचं ज्यांना ज्यांना भाग्य लाभले ते खरच नशीबवान…. तुझ्या जिभेवर कायम सरस्वती बोलत असते ग… बोलताना जा तडफडते तळमळीने बोलतेस… त्यातूनच आमचाही जीव कासावीस होतो… काय बोलू… किती लिहू.. ही लेखणी ही कमी पडेल… माई तु फक्त अनाथांचीच नाहीस तर सगळ्या सनाथांची सुद्धा तू आहेस …
तू म्हणजे माझी ऊर्जा माझी शक्ती माझी भक्ती

सिद्धी विनायक कामथ
(प्रसिद्ध अभिनेत्री, समाजसेविका)
मोबाईल नंबर – ९८६७३९३६७५