
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी महाराष्ट्र शासनामार्फत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम दिनांक १५ सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंअंतर्गत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नियुक्त कर्मचारी व स्वयंसेवक दररोज महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील किमान ५० घरांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजनची पातळी तपासतील. ह्या भेटीदरम्यान कोरोनाबाधित व संशयित रुग्णांचा शोध घेतला जाईल. मोहिमेंअंतर्गत मधुमेहसह इतर आजार (उदा.हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार, लठठ्पणा इ.) असलेल्या व्यक्तींना संदर्भित उपचार देखील देण्यात येतील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणती महत्वाची पाऊले उचलायला हवीत याची माहिती दिली जाईल. मोहिमेदरम्यान कर्मचारी व स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबास दोनदा भेट देतील.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. सदर मोहीम राबविणे कामी अधिक प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता इच्छुक स्वयंसेवकांनी त्यांच्या क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन मोहिमेत सहभागी होणे कामी आपली नोंद करावी. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व नागरिकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणार असल्याने अधिकाअधिक स्वयंसेवक मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन मा. आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांचे मार्फत महानगरपालिका क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांना करण्यात येत आहे.