
◆ अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना दिले लेखी निवेदन
◆ प्रकरणाचा संपुर्ण तपास एलसीबी ला देण्याची भाजपाची मागणी
वसई : शुक्रवारी वसईतील माणिकपूर येथील पेट्रोलपंप वर काही गुंड प्रवृत्तीच्या आठ-दहा लोकांनी मिळून मास्क न घातल्यामुळे पेट्रोल मिळणार नाही असे पेट्रोलपंप कडून सांगितल्याने झालेल्या वादातून पेट्रोलपंपची तोडफोड केली पेट्रोलपंपच्या मालकास मारहाण केली. तसेच पेट्रोलपंपच्या महिला कर्मचाऱ्यास हात पिळवटून अत्याचाराचा प्रकार करण्यात आला. ही सर्व घटना माणिकपूर पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या हद्दीत घडली. धक्कादायकबाब म्हणजे घटना ठिकाणी माणिकपूर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी उपस्थित होते. तरीही ही घटना घडली. याबाबतीत भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी घडलेल्या घटनेत माणिकपूर पोलीस स्टेशनची भूमिका ही संशयास्पद असल्याची माहिती लेखी निवेदनाद्वारे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना दिली. तसेच संपूर्ण प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना पत्राद्वारे कळवली.
या निवेदनामध्ये त्यांनी अनेक संशयास्पदबाबींचा चा समावेश केला. ज्यामध्ये घटनास्थळी दोन पोलीस कर्मचारी उपस्थित असताना आरोपी पाळण्यात यशस्वी झालेच कसे?
घटनास्थळी 2 पोलिस कर्मचारी जर उपस्थित होते तर त्यांनी बघ्याची भूमिका का घेतली?
माणिकपूर पोलिस स्टेशनने तात्काळ नाकाबंदी लावून आरोपींना का पकडले नाही.
मागील 24 तासात काय प्रयत्न केले गेले?
आरोपी कोण आहेत?
फक्त कोविड संदर्भातील गुन्हे दाखल केले आहे महिलेवर झालेल्या अत्याचार संबंधित कलम लावलेली नाहीत. आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत असे निवेदनाद्वारे त्यांनी लक्षात आणून दिले.
यावेळी बोलताना त्यांनी, यासर्व प्रकारामुळे मोठ्याप्रमाणात माणिकपूर पोलिसांच्या कार्यशैलीवर संशयाला जागा निर्माण होत आहे.
यापूर्वी ही वायरल झालेल्या व्हिडीओनुसार कासा येथे घडलेल्या घटनेमध्ये हिंदू साधूंच्या बाबतीत पालघर पोलिसांकडून अशीच बघ्याची भूमिका घेण्यात आली होती अशी जनमानसात भावना आहे. असे ते म्हणाले. तरी हा तपास
तरी आपण याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी व हा संपूर्ण प्रकरणाचा तपास एलसीबी ला देण्याची भारतीय जनता पार्टी ची मागणी आहे. असे ते म्हणाले.
उत्तम कुमार व त्यांच्या शिष्टमंडळाने काल पेट्रोलपंप व अत्याचार झालेल्या महिलेची काल भेट घेतली व त्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.