पालघर दिनांक 11 मार्च 2021:- मुरबे , तालुका व जिल्हा पालघर येथील साधारणपणे सहा कोटी रुपये खर्च करून बंदर विकास कामे सुरू आहेत त्या कामाची पाहणी माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी केली ही कामे राष्ट्रीय कृषी विकास योजना नाबार्ड व मत्स्यव्यवसाय खाते ,पालघर जिल्हा नियोजन समिती तर्फे सुरू आहेत त्यातील अंदाजे चार कोटी 65 लाखांची कामे ही राष्ट्रीय कृषी विकास योजना व नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळालेली आहे.
त्यात मुरबे बंदर किनारा ॲपरोच रोड साधारणपणे 600 मीटर लांब व पाच मीटर रुंद आहे ,त्याचे काम प्रगतीपथावर आहे .
मुरबे बंदर किनारी उतरता धक्का लांबी 65 मीटर व रुंदी पाच मीटर आहे ,काम पूर्ण आहे .
मुरबे बंदर किनारी बोट यार्ड 40 मीटर लांब 15 मीटर रुंद काम पूर्ण आहे
तसेच 35 मीटर लांब व 15 मीटर रुंद हे काम प्रगतीपथावर आहे.
मुरबे बंदर किनारी बोट बसिन 40 मीटर लांब व 20 मीटर रुंद तसेच
35 मीटर लांब व 20 मीटर रुंद काम चालू आहे
तसेच मत्स्य व्यवसाय खाते व जिल्हा नियोजन समितीतून अंदाजे 40 लाखाची कामे बंदर विकासाची सुरू आहेत त्यात
नेट वेडिंग शेड उघडा निवारा काम प्रगतिपथावर आहे
उतरता धक्का जेटी कामपुर्ण झाले .
माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांनी समाधान व्यक्त केले गावकऱ्यांची संवाद साधून ह्यात अजून काय चांगले करता येईल याबद्दल चर्चा केली, मी मच्छीमार बंदराची विकास कामे करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो सातपाटी गाव असो मुरबे गाव असो वसई तालुक्यातील पाचुबंदर असो डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू किंवा इतर मच्छिमार गाव असोत पालघर जिल्ह्यातील साधारणपणे 50 मच्छीमार गाव आहेत आणि ह्या गावांच्या बंदरांचा विकास करण्यासाठी खासदार म्हणून मी सतत प्रयत्नशील राहील आणि या आधीही राहात आलेलो आहे. माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांच्यासोबत शिवसेना लोकसभा सहसमन्वयक केदार काळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील.,पंचायत समिती सदस्य जितेन मेहेर मुरबे गावचे सरपंच राकेश तरे , उत्कर्ष मच्छीमार सोसायटीचे काशिनाथ पाटील ,ग्रामपंचायत सदस्य तुषार वाडीकर, मुक्ताताई देव ,उर्मिला पाटील, कमळाकर तरे, कैलास पाटील ,साजिद शेख, राज तरे शिवदास तरे ,गावातील ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित समाजसेवक, तांडेल व मच्छीमार उपस्थित होते माननीय खासदार श्री राजेंद्र गावित मुरबा गावातील बंदर विकास कामासाठी नेहमीच सहकार्य करतात म्हणून गावकऱ्यांनी माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed