
नालासोपारा: विरार परिसरातील पुस्तक विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या मानवाधिकार संघटनेच्या दोन सदस्यांना 15 हजार रुपये रोख रक्कम घेताना पोलिसांनी दोघांना अटक केली असून फरार सदस्यांचा शोध घेत तपास करत आहे. विरार येथील पुस्तक विक्रेते व्यापारी होळसेलमधून पुस्तकें आणून विविध शाळेमध्ये पुस्तकावरील छापील किमतीपेक्षा 5 ते 10 रुपये जास्त लावून विकायचे ही माहिती नालासोपारा शहरातील मानवाधिकार संघटनेच्या काही सदस्यांना मिळाल्यावर पुस्तक विक्रीचा व्यवसाय करू देणार नाही अशी धमकी देऊन 1 लाखांची खंडणी मागण्यात आली होती.घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी 50 हजार रुपये दिले उरलेले नंतर देतो असे सांगितले परत या सदस्यांनी पैशाची मागणी केल्याने व्यापाऱ्याने विरार पोलिसांशी संपर्क साधून हकीकत सांगितली. मंगळवारी विरार पोलिसांनी सापळा रचुन दुकानात पैसे घेण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे मोहम्मद अली अकबर मोहमद फिरोज मोहमद जाहिद शेख या दोघांना 15 हजार रोख रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले माहिती तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी बोरकर यांनी आमच्या पत्रकारांना सांगितले आणि अन्य इतर साथीदार आरोपी फरार आहे त्यांचा पोलीस शोध घेत आहे. मानवाधिकार सदस्यांचा सुळसुळाट तालुक्यात मानवाधिकार आयोगाचा वापर करून काहींनी दुकाने थाटली आहे . या बाबत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी झाल्यावर अशा बोगस दुकाने थाटलेल्यावर आणि आयोगाच्या लोगो वापरण्यावर कारवाईसाठी जस्टीस एस.आर बतूमार्व् यांच्याकडून पालघर पोलिसांनी कोर्टाची ऑर्डर पाठवली होती।. मानवाधिकार आयोग नावाचा वापर आणि त्याचा लोगोचा खरोखरच असा कोणी गैरवापर करत असेल तर त्यावर चाप बसणे आवश्यक आहे.यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती तपासली जाणे आवश्यक आहे.अशा लोकांमुळे काम करण्याऱ्या सदस्या ची बदनामी होते त्यामुळे पालघर पोलिसांनी दोषींवर कारवाई केली पाहिजे:- नरेंद्र बाईत (राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार फौंडेशन)
