
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘डी’ आचोळे कार्यक्षेत्रातील एव्हरशाईन सिटी, लास्ट स्टॉप, वसई पूर्व येथे दिनांक १३/०९/२०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार तसेच मा.अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांच्या आदेशानुसार व मा.उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे निर्देशानुसार प्रभाग समिती ‘डी’ सहा.आयुक्त श्रीम.विशाखा मोटघरे यांनी ९ अनधिकृत टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई केली. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख श्री.भरत पाटील, अभियंता केयूर पाटील, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देशानुसार मा.उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहे.


