मी पोशिंदा, सरकार शर्मिंदा

अवकाळी पावसान रस्त्यावर आलो
देशाचा मी पोशिंदा .
निवडणुक काळातले शेतकऱ्यांचे
कैवारी आहेत का शर्मिंदा ?
सत्ताधारी मंत्री आज आहेत खाते
वाटपात मग्न .
सत्ता, राजकारण बाजुला ठेवुन जरा
विचार करा कसे दुर करायचे हे विघ्न .
मुख्यमंत्री पदासाठी भाजप ,शिवसेनेत
चालु रस्सीखेच .
आपसात यांच जमेना मग आमच काय ?
सामान्य जनतेला पडला पेच .
हाता तोंडाशी आलेल पिक गेल शेतकरी
ओल्या दुष्काळान मेला .
शेतकऱ्याच आश्रु पुसण्या तिथ एक मंत्री
नाही गेला .
मेलेल्यांच्या टाळुवरचे लोणी सांगा कुणी
कुणी खाल्ले.
शेतकऱ्यांच्या विमा कंपन्याची नावे केवळ
कागदोपत्रीच राहीले .

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *