

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांचे प्रमुख व सदस्य यांनी सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. या भेटीवेळी मा.महापौर श्री.अजीव पाटील, मा.उप-महापौर श्री.मार्शल लोपीस, मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), मा.माजी आमदार श्री.क्षितीज ठाकूर, मा.सभागृह नेते श्री.प्रफुल साने, अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, परिवहन व्यवस्थापक श्री.धैर्य़शील जाधव, उप-संचालक नगररचना श्री.मनिष भिष्णूरकर, नगररचनाकार श्रीम.श्वेता माने, जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA चे प्रमुख सेईचिरो अकीमुरा व संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सदर प्रकल्पाबाबत करावयाच्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच यावेळी उपस्थितांसमोर संबंधित प्रकल्पाचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरण करण्यात आले.
