सातारा जिल्ह्यातील तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामस्थांच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार Dr Shrikant Eknath Shinde , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला, पण माझ्या जन्मभूमीतील झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेतांना तो प्रेरणादायी ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे. राज्याचा सर्वांगीण
विकास करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यात मोठे उद्योग उभारणीवर भर देण्यात येणार आहे. #महाबळेश्वर-तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला जोडण्यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी सत्कारप्रसंगी सांगितले.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *