

शनिवार दिनांक १९/०९/२०२० रोजी किल्ला बंदर येथील अनाथ आश्रम मधे भाजपा तर्फे मुलांना वह्या, पेन, मास्क व चॉकलेट वाटप करून भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार आयोजित ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत वह्या वाटप कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
भाजपाचे लोकप्रिय माजी नगरसेवक श्री. किरणजी भोईर यांनी वह्या उपलब्ध करून सिंहाचा वाटा उचलला, तसेच अल्पसंख्याक सेल जिल्हा सचिव मुबिन कौल, सहकार सेल जिल्हा सहसंयोजक श्री. मुकुंदजी मुळये, भाजयुमो जिल्हा चिटणीस प्रतिक चौधरी, वसई मंडळ सरचिटणीस अमित पवार, भाजपा जिल्हा चिटणीस किरण पाटील, धडाडीचे भाजपा कार्यकर्ते हेमंत राज्यगोर, नवभारत अर्बन पतपेढी संचालक देवेंद्र नाईक, वसई मंडळ अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख, वसई मंडळ मा. महिला मोर्चा अध्यक्ष रोविना कुटिन्हो यांनी विशेष मेहनत घेतली.