

वसई मधील मुळगाव विभागातील दिगोडी वाडी येथील विद्युत तारांन वरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी विद्युत महामंडळाचे कर्मचारी गेले असता, तेथील झाड मालक आणि बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्या ह्याने विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यास दगडांचा धाक दाखवून विद्युत तारांवरील झाडाच्या फांद्या तोडण्यास अडथळा, व्यत्यय आणून कामे रोखली आहेत.
विद्युत महामंडळाच्या नियम नुसार तारांच्या आजूबाजूस 8 मीटर अंतरा पर्यंत झंडांच्या फांद्या छाटण्याचा अधिकार असतानाही, सदर व्यक्तीने विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यास कामात अडथळा आणून धमकावले आहे.
मुळगाव मधील पालिका सभापती, नगरसेवक, इतर लोकोरतिनिधी सदर घटने बाबत गप्प असल्याने, तेथील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली दिसत आहे.

कायदा सुरक्षा राखण्यासाठी, विद्युत महामंडळ व लोकप्रतिनिधी सदर व्यक्तीवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का ?