
वसई,(मनिष म्हात्रे) : अवघ्या 40 व्या वर्षी पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाल्यावर त्या धक्क्यातून सावरत तीच्या बाराव्याला भेटवस्तू म्हणून 300 आंब्याची कलमे वाटत निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न वसईत करण्यात आला आहे.क्रियाकर्म केल्यानंतर जुन्या ॠढी परंपरेला छेद देत जागतीक पर्यावरण दिनाला केलेल्या या उपक्रमाचे सद्या वसईत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वसईतील सत्पाळा गावातील जोत्स्ना जयप्रकाश ठाकूर या विवाहितेचा 27 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.तीचे पती जयप्रकाश ठाकूर हे वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती असून तीच्या अंतविधीसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थीत राहतील म्हणून लाॅकडाऊनचे नियम पाळत कमीत कमी लोकांनी अंतविधीस यावे तसेच जमल्यास फोनवरून सांत्वन करावे असे आवाहन त्यांनी केले होते.
‘तु निघुन नाहीस गेली, गेली तुझी कुडी,अखंड आठवणीत राहील तुझ्या आठवणींची गढी…लाॅकडाऊनचे नियम पाळा कोरोना टाळा असे कविमनाच्या जयप्रकाश ठाकूर यांनी आपल्या कवितेतून पत्नीला श्रद्धांजली तर नागरीकांना आवाहन केले होते.अंतविधी पार पडल्यानंतर दुस-या दिवशी अस्थी समुद्रात विसर्जीत केल्यानंतर उरलेली राख जयप्रकाश यांनी जमा करून स्मशानातील दोन कोप-यात खड्डे खणून त्यात ती राख टाकून जांभळाची दोन कलमे तिथे लावली.पत्नीची आठवण कायम चिरंतन राहण्यासाठी त्यांनी त्या दोन्ही झाडांना दप्तक घेतले आहे.त्यानंतर बाराव्याला क्रियाकर्म विधी साध्या पद्धतीने घरी केला.यावेळी बाराव्याला आलेल्या आत्पस्वकीयांना पत्नीच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून एक एक झाडं लावण्यासाठी दिले.त्यासाठी त्यांनी डहाणूतील एका नर्सरीमधून तब्बल हापूस व केसरच्या जातीची 300 कलमे वाटण्यासाठी आणली होती. हि झाडे त्यांनी नातेवाईक, मित्रमंडळी, गावातील शेतक-यांना वाटली.
खरतरं माणूस मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीची आठवण म्हणून एखादे भांडे किंवा वस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र जयप्रकाश ठाकूर यांनी या सर्व प्रथांना बाजूला सारत एक नवीन आदर्श लोकांपूढे ठेवला आहे.अवघ्या वीस वर्षाच्या संसारवेलीवर त्यांना प्रत्यय नावाचा मुलगा आहे.पत्नीच्या मृत्यूपश्चात तीच्या नावाने दोन झाडे स्मशानात लावून त्यांनी ती दप्तक घेतली आहेत.इतकेच नव्हे तर जागतीक वनदिनीच शेकडो आंब्याची झाडे लावून पत्नीची स्मृती व निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे .या त्यांच्या कृतीचे वसईत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर प्रविण शेट्टी, नगरसेवक अजीव पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबन नाईक, नारायण मानकर,पंकज चोरघे यांनी ठाकूर यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.