
मुंबई : दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी रायगड रत्नागिरी जिल्यातील महाड आणि चिपळूण तालुक्यातील काही पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, हयात प्रामुख्याने महाड मधील,खरवळी आणि चिपळूण मधील दळवणे या गावांचा समावेश होता.
मानवाने निसर्गावर केलेले अतिक्रमण आणि त्याचाच प्रतिकार म्हणुन कदाचित हे संकट आपणास भोगावे लागले.
याचा खूप मोठा फटका कोकणाला बसला यात प्रामुख्याने महाड, चिपळूण, खेड या ठिकाण मोठी हानी झाली.
यामधे कित्येकांचे संसार स्वताच्या डोळ्या समोर होत्याचे नव्हते झाले. आपलीच माणसं नजरेसमोरून नाहीशी होते होती आणि हे सगळ केविलवाण्या डोळ्यांनी बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय कोकणवासीयांनकडे उरला नव्हता.
झालेल नुकसान हे कधीच भरून येणारे नाही परंतु आपल्याच माणसांचा संसार पुन्हा उभा करण्याकरिता त्यांना धीर देण्याचा प्रयत्न मैत्री प्रतिष्ठा या संस्थेने केला आणि तमाम जनतेला मदतीसाठी आव्हान केले आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात घरगुती उपयोग वस्तू, कपडे, धान्य , जेवणाची सामग्री व आर्थिक मदत संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात जमा झाली. मिळालेली मदत योग्य त्या ठिकाणी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन पाहणी करून खरोखरच ज्यांना गरज आहे अश्या गरजू लोकांपर्यंत पोचेल याची खबरदारी घेतली. घरोघरी स्वतःत भेट दिल्याने सत्य परिस्थीती डोळ्या समोर आली.
या कठीण प्रसंगातून सावरण्याची ताकत परमेश्वर प्रत्येकाला देवो, कोकणी माणसाने कधी कोणापुढे हात फसरले नाही हेही दिवस जातील कोकणी माणूस हा नेहमी जिद्दीने लढणार आहे हे आम्ही पाहिले .
आमच्या हितचिंतक मित्र परिवारांनी आमच्या हाकेला साद देत आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याच जोरावर आज आम्ही प्रत्यक्षरित्या जाऊन मदत नव्हे तर आमचं कर्तव्य निभवू शकलो, अश्या आमच्या प्रत्येक देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत असे बोल या वेळी मैत्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दिनू रिकामे यांनी व्यक्त केले
ह्या कामात आम्हाला ज्यांची मोलाची साथ लाभली असे राधा कृष्ण मंडळ चरई खुर्द (विशेष सहकार्य निलेश काते ), राकेश घरत (मालक, रखुमाई डेव्हलपर्स) स्वयंसेवक तेजस मोरे , रोशन पवार , विशाल काप, जितेंद्र कळमकर या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आपली साथ ह्यापुढेही आम्हाला लाभेल अशी आम्ही आशा बाळगतो आणि देव ह्या संकटातून आम्हा सर्वांना लवकर मुक्त करो अशी मनस्वी प्रार्थना करतो.
या मदतीच्या उपक्रमात मैत्री प्रतिष्ठान चे दिनू रिकामे, विपुल पोरे, प्रभाकर तांबे, अनिकेत साटम ,नितीन शिंदे ,राहुल कानसे, विक्रांत पडियार ,विशाल रिकामे, सुधीर रिकामे, मयूर शिंदे ,विराज हेमले, संजय राहटे, मंगेश पेडणेकर , यश धुरी,सुभाष टेमकर, सचिन रिकामे ,आणि साथ देणारे त्यांच्या सहकारी मित्रांचे याबद्दल सर्व स्थरातून कॊतुक होत आहे.