व.वि.श.मनपा आयुक्त मा.गंगाधर डी. यांच्याकडून सकारात्मक प्रतीसाद

एकूण दहा मागण्या पैकी नऊ मागण्या मान्य!

वसई (प्रतिनिधी) वसई विरार महानगरपालिका विरोधात भारताचा माक्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)येत्या ९आँगस्ट रोजी विविध मागण्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढणार होते. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची कार्यकर्ते यांनी मोर्चाची आखणी जोरदार सुरू केली होती,प्रत्येक गावात मोटार सायकलवर रॅली काढून गावा गावात भेट देऊन पाडा पाडा मध्ये मिटिंग लावून पक्षाची बांधणी बरोबर मोर्चाची बांधणीला सुरुवात केली होती आणी मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात सामील होण्यास आव्हान करत होतो.
एकीकडे संघटनेचे पदाधिकारी आंदोलनाची तयारी करत होते आणि दुसरी कडे मोर्चाचे नेतृत्व करणारे कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सदस्य कॉम्रेड कु.शेरू वाघ यांना पोलीस प्रशासन नोटीस आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते, तसेच स्थानिक पत्रकार बांधवांनी यांनी आंदोलनाचे बातमी लावून धरल्याने प्रशासनाला जागवण्याचे काम त्यांनी केले.
वसई विरार महापालिकेतून अचानक पणे आयुक्त यांच्या बरोबर चर्चे साठी दोन कार्यकर्ते बरोबर दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 2 वाजता बोलवण्यात आले, कॉम्रेड आदेश बनसोडे सोबत कॉम्रेड
शेरू वाघ हे दोन कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात चर्चेसाठी गेले आणि सकारत्मक पणे आयुक्त साहेबांनी प्रतिसाद दिला.
दहा मागण्यांपैकी नऊ मागण्या त्यांनी मान्य केले! मागण्या खालील प्रमाणे
१) मागणी १७५ सफाई कामगारांना कामावरुन काढलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्या ह्यावर आयुक्तानी उत्तर दिले आम्ही लाँकडाउन च्या काळात एकाही कामगारांला कामावरुन काढलेले नाही.
संघटनेच्या कार्यकर्त्यानी १७५ कामगारांची नावांची यादी आयुक्तांपुढे मांडली त्या वर आयुक्तांनी उत्तर दिले आम्ही एकाला ही कामावरुन काढलेले नाही. आणि मागचा काळात जर कामगांरांना काढले असतील तर ते मला माहीत नाही,त्यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारावर कडक कारवाई करावी म्हणून मा.आयुक्ताकडे मागणी केली असता त्यावर आयुक्तांनी १०दिवसात कारवाई करून संघटनेला कळवू असे लेखी आश्वासन दिले त्यामुळे ९आँगस्ट चा मोर्चा माग घेण्यात आला आहे.
2 )दिवलई पाड,नाळा बेना पट्टी,जिवदानी कैल दांडी पाडा,ह्या आदिवासी पाड्यात तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करा..
3)जे आदिवासी कूटुंब पिढ्या न पिढ्या पासुन शेठ सावकारांच्या जमिनित राहून मजूरी करतात त्यांच्या राहत्या घराला घरपट्टी लावली पाहीजे…
4 )नविन घरकूल योजनेच्या अंतर्गत घरकूल द्या
5)आगाशी येथे असलेला धोबीतलावाला संरक्षण भिंत बांधा..
6)उमराळे येथे असलेल्या आदिवासी कुटुंबाचा घरपट्टी महापालिकेने फेर फार करुन बिगर आदिवासी च्या नावे घरपट्टी केलीआहे.ती पुन्हा मुळ आदिवासी कूटूबांच्याच नावे करा…
अश्या अनेक मागण्या महानगर पालीकेच्या आयुक्तांनी मान्य केल्या असल्याने लाल बावट्याचा मोर्चा मागे घेण्यात आला आहे…
त्याच बरोबर १७५कामगारांना कोणी कामावरुन काढले त्याची चौकशी करून दाहा दिवसात कामगारांना समाधानकारक न्याय न मिळाल्यास पुढच आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशारा भारताचा माक्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड शेरू वाघ यांनी आयुक्तांना लेखी पत्रका द्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *