

नालासोपारा रहमत नगर मध्ये तरुण सार्वजनिक गल्ली रस्त्यावर उभी असलेली रिक्षा गाडी आदी. या ठिकाणी बनले अड्डे अशा ठिकाणी ते सहज नशा करत आहे अश्यामुळे आजची तरुण पिढी सज्जनांची संगत घेण्याचे टाळून दुर्जनांच्या विळख्यात सापडू लागले आहेत. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. पौष्टिक दुधाऐवजी अंमल चढवणा-या मद्याचा ग्लास हातात धरणारी आजची तरुण पिढी गांजा, चरस, गर्द पावडर, हेरॉईन, ब्राऊन शुगर इत्यादी मादक पदार्थाच्या व्यसनात गुरफटत आहे. घरचे सात्विक अन्न सेवन करायचे सोडून जिभेचे चोचले पुरविण्यासाठी हॉटेलमधील अन्न, चायनीज पदार्थ, जंक फूडसारखे पदार्थ खाऊन रोगराईला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे अश्या परिस्थितीत स्थानिक प्रतिनिधी, समाजसेवक सामाजिक संस्था व प्रशासन अधिकारी पोलीस यांनी लक्ष द्यावे यांनी या गोष्टीला आळा घालावा जेणे करून येणारे भविष्यात तरुणांची आयुष्य वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी.