

युवक मित्र मंडळ केळवे चा सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नवरात्र उत्सव दरम्यान वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.
आज दिनांक २-ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी भरविण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत केळवे परिसरातील २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.मुलांनी झाडे लावा झाडे जगवा,स्वच्छता हिच सुंदरता,सर्व धर्म समभाव असे सामाजिक संदेश देणार्या चित्रांचे सुंदर रेखाटन केले होते.
यशस्वी विद्यार्थ्यांसाठी लागणारी बक्षिसे बोईसर येथील कोकियो-कॅमलिन लिमिटेड कंपनी, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था,विधाता ग्रॅफिक्स व युवक मित्र मंडळ केळवे तर्फे देण्यात आली.
त्याच प्रमाणे वसंत जैन व हिमंत जैन यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.केळवे शेतकी सोसायटी ह्यांनी स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाची रूपरेषा व संकल्पना व मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भुवनेश किर्तने विद्यालयाचे कला शिक्षक विनय पाटील सर,चित्रकार जितेंद्र धनु,चित्रकार व ग्रॅफिक्स डिझायर विपुल बारी, आदर्श विद्यामंदिर केळवे शाळेचे कला शिक्षक तसेच केळवे परिसरातील इतर शाळांमधील शिक्षकांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
आजच्या बक्षिस वितरण समारंभासाठी,कोकियो कॅमलिन चे श्री.अजित राणे साहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री.नितीन वझे, आदर्श विद्यामंदिर केळवे चे माजी मुख्याध्यापक श्री.हरियर पाटील सर, नुतन विद्या विकास संस्थेचे निलेश चौधरी,डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचेच सदस्य तसेच युवक मित्र मंडळ केळवेचे संस्थापक सदस्य सभासद हजर होते.
मंडळाचे सदस्य श्री कौशिक साखरे ह्यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व इतर गावकरी ह्यांच्या कडून स्वच्छता प्रतिज्ञा वदवून घेतली तसेच ती अमलात आणण्याची व इतर व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यीची कळकळीची विनंती केली आहे.
कार्यक्रमाची सांगता हि स्वच्छता संदेश, महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या आठवणींना वंदन करून झाली.