वसई–विरार :


युवाशक्ती कामगार संघटनेला महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते मा. श्री. मिलिंद रानडे यांचा ठाम व भक्कम पाठिंबा जाहीर झाला आहे. वसई–विरार शहर महानगरपालिका (VVCMC) हद्दीतील मजुरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवाशक्ती कामगार संघटनेच्या पुढाकाराने लवकरच मा. श्री. मिलिंद रानडे हे VVCMC ला भेट देणार आहेत.

महानगरपालिकेतील कंत्राटी पद्धतीतील शोषण, वेतन, थकीत देणी, कामाची सुरक्षितता व श्रमकायद्यांची अंमलबजावणी या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात ठोस भूमिका घेत प्रशासनासमोर प्रश्न मांडले जातील, असे संकेत देण्यात आले आहेत.

कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र केला जाईल, अशी ग्वाही मा. श्री. मिलिंद रानडे यांनी दिली असून, युवाशक्ती कामगार संघटनेच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *