

युवाशक्ती फाऊंडेशन नेहमी वेगळ्या पण महत्वाच्या मुद्दयांवर काम करते, हीच या संस्थेची ओळख आहे. असाच एक महत्वाचा पण वेगळा उपक्रम घेवुन आम्ही आलो आहोत.स्त्री शिवाय घराला घरपण नाही . पण जेव्हा त्याच स्त्रीची स्वत: बद्दल निष्काळजी दिसते , तेव्हा वाईट वाटत. संपुर्ण घराची काळजी घेणारी, जबाबदारी घेणारी ‘ ती’ , तीच्या आरोग्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. तीला मासिकधर्म नाही आला तर तीच लग्न होत नाही कारण वैध्यकिय भाषेत तिला मुल होणार नाही . मग समाजाची तीच्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो. पण या मासीक पाळीच्या दरम्यान तीने स्वच्छतेची काळजी नाही घेतली तर तीला अनेक रोगांना सामोरे जाव लागत, कधी कधी थोडक्यात निभावते तर कधी कॅन्सर सारख्या रोगाचे बळी व्हावे लागते. काही वेळा मासीक पाळीत स्त्रीयां कपड्याचा वापर करतात म्हणुन पण यासारख्या आजारांना बळी पडावे लागते.यावर कुठेतरी नियंत्रण करण्यासाठी आम्ही आमच्या युवाशक्ती फाऊंडेशन समाजसेवी संस्थेने या महीन्यापासुन अश्या गरजु ,गरीब महीलां व मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे पॅक पुरने ही सुविधा चालु केलीय. इथुनपुढे दर महिन्याला आम्ही सॅनेटरी नॅपकिन या गरजु महीलांना उपलब्ध करुन देणार आहोत. या कामात संपुर्ण युवाशक्ती फाऊंडेशनची टिम कार्यरत होती. यात प्रामुख्याने नायगांव पुर्वचे समाजसेवक मा. धरेंद्र कुलकर्णीजीचे खुप आभार मानते त्यानी एकदा एकताच मदत केली.त्याच बरोबर नायगाव युवाशक्ती फाऊंडेशनच्या सदस्या उर्मीला पाटील व हर्षला सहाय्यक होत्या .या फाऊंडेशच्या सरचिटणीस रुबिना मुल्ला यांची कामगिरी उल्लेखनीय होती , खजिनदार तुषार गायकवाड . विशाल धोत्रें , नितेश आणी अनमोल , मन्सूर सरगुरुह. यांची उत्तम साथ होती.महत्वाचे म्हणजे या संस्थेच्या संस्थापक . स्नेहा ताई जावळे यांची वेगळी विचार क्षमता व त्यांचे सामाजीक कार्य हीच या आगळ्या वेगळ्या उपक्रमांची जननी आहे.
Really Great social activity .Wish u all the best for Yuvashakti foundation.