प्रश्न सुटे पर्यंत काॅम्रेड अरूणा मुकणे बसणार आमरण उपोषणाला

लाल बावट्याने आता वसई तहसीलदार आणि प्रशासना विरूद्ध कंबर कसली आहे

वसई तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांना घेऊन लाल बावट्याच्या वतीने सातत्याने निवेदनं देण्यात आली होती.प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्यासाठी मोर्चे, आंदोलने,धरणे ई. मार्गाने देखील झोपी गेलेल्या प्रशासनाला जागं करण्याचा सतत प्रयत्न लाल बवट्या मार्फत केला गेला. पण प्रशासनाने तेवढया पुरते कधी तोंडी तर कधी लेखी आश्वासन देण्यात यायचे.पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न काही प्रशासनाने सोडवले नाहीत.म्हणून १ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण व बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक लाल बावट्याणे दिली होती.सोमवार पासून आंदोलन करणार म्हणुन रविवारीच वसई तहसीलदार कार्यालय उघडावे लागले.अखेर दहा दिवसांत सर्व मागण्या आम्ही मान्य करू आणि त्या पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलू असे ठोस आश्वासन प्रशासनाणे दिले तसेच जातीच्या दाखल्याची सर्व प्रकरणे तत्काळ निकाली काढु.अरुणा मुकणे आणि तुम्ही मंगळवारी मला येऊन भेटा असे आश्वासन देखील वसई तहसीलदार उज्वला भगत बनसोडे यांनी दिले. आश्र्वासनानंतर १नोव्हेंबर रोजी होणारे नियोजित आंदोलन लाल बावट्याने स्थगित केले. आणि ठरल्या प्रमाणे मंगळवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पुर्ण दिवस अरूणा मुकणे व इतर महिला कार्यकर्त्या तहसीलदारांच्या भेटीसाठी कार्यालयात बसून होत्या. अनेक वेळा फोन करून देखील तहसीलदारांनी फोन उचलला नाही. यावरून आमच्या लक्षात आले की तहसीदार आणि प्रशासनाने पुन्हा आमची फसवणूक केली आहे.म्हणुन आता लाल बवट्याने जनतेच्या न्यायप्रिय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेवटची आणि निकराची लढाई आंदोलनामार्फत करायची असे ठरवले आहे. आता लाल बावट्याणे तहसीलदार आणि वसई प्रशासनाविरुद्ध कंबर कसली आहे.येत्या सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता वसई एसटी डेपो येथुन हजारो च्या संख्येने एकत्र जमुन एसटी डेपो ते तहसीलदार कार्यालय मोर्चा काढून अरूणा मुकणे ह्या बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.व हजारो कार्यकर्ते बेमुदत ठिय्या आंदोलन करतील. आंदोलनात येताना लोकांनी लाकडं,टोप,भाजी-पाला,सर्व संसार घेऊन मोर्चाला यायचे आहे .सद्ध्या थंडीचा तडाका असल्याने रात्री अंथरूण -पांघरूण देखील घेऊन या असे आवाहन लाल बावट्याच्या वतीने काॅम्रेड शेरू वाघ ह्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *