
राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)
वार्ताहर – महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करिता रुग्णांना मार्गदर्शन करताना रुग्णांच्या तक्रारी होत्या की त्यांना योजनेच्या व्यतिरिक्त ज्यादाची रक्कम रुग्णालयात भरावी लागते. योजनेमार्फत मोफत न मिळता वरून पैसे मागण्याच्या तक्रारी रुग्ण मित्र कडे येत होत्या; अशा वेळी रुग्णमित्रांचे शिष्टमंडळ योजनेचे सीईओ डॉ सुधाकर शिंदे यांना भेट देण्यास गेले होते.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दर खासगी रुग्णालयांना परवडत नसल्याचे कारण देत रुग्णांकडून शस्त्रक्रिया साठी अतिरिक्त रकमेची मागणी खासगी रुग्णालय करते. आज झालेल्या बैठकीत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असता डॉ सुधाकर शिंदे यांनी इतर राज्यातील योजनेचे दर व आपले दर हे कमी अधिक प्रमाणात सारखे असल्याचे सांगितले तरी रुग्णांना काही तक्रारी असल्यास त्यांनी आम्हाला पत्राद्वारे कळवावे आम्ही नक्कीच रुग्णालयांवर कारवाई करू असे आश्वासन दिले. योजनेतील काही शस्त्रक्रिया फक्त सरकारी रुग्णालयांत करणे बंधनकारक असते या मुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते अशा शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात देखील व्हाव्या तसेच योजनेची कमाल मर्यादा वाढवावी अशी मागणी रुग्णमित्रांनी केली. स्व बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लवकरच अमलात येईल अशी ग्वाही देत डॉ सुधाकर शिंदे यांनी रुग्ण मित्रांना योजनेची प्रणाली कशी कार्य करते यासाठी रुग्ण मित्र, संस्था भेट उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ऑगस्ट महिन्यात रुग्णमित्रांना वेळ देण्याचे कबूल केले. योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी शक्य होईल तितके प्रयत्न व मार्गदर्शन मदत रुग्ण मित्रांना मिळेल अशी व्यवस्था करणार आहेत. रुग्णमित्र विनोद साडविलकर, धनाजी पवार , अमिता शर्मा यांनी ध्रुवराज व्ह्यू साप्ताहिक व अग्निशिला हिंदी मासिक डॉ सुधाकर शिंदे यांना भेट दिली.
{रुग्णांनी पुढे येऊन तक्रार करावी, कारवाई केली जाईल!
डॉ सुधाकर शिंदे
सीईओ – जीवनदायी आरोग्य योजना}